Sunday, August 12, 2018

संशोधन आराखडा

संशोधन आराखडा

संशोधन आराखडा हा संशोधन प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग मानला जातो. आपल्या संशोधनाची रूपरेषा निश्चित करणे म्हणजे संशोधन आराखडा होय. साधी व्याख्या लक्षात घेतली तर ‘‘संशोधनाचा आराखडा म्हणजे तथ्य जमविणे, त्याचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे यासाठी आखलेली योजना होय. त्यामुळे संशोधनाचा हेतू साध्य होण्यासाठी केलेल्या प्रक्रियेत वेळ, पैसा व श्रमाची बचत होते.’’
जेव्हा संशोधनाचा विचार संशोधकाच्या डोक्यात असतो. तेव्हाच त्यातून अपेक्षित उत्तर हे तो गृहितकृत्याच्या स्वरुपात मांडतो व त्यानंतर गृहितकृत्याची मांडणी केल्यानंतर संशोधनाचा आराखडा प्रामुख्याने तयार करावा लागतो. आता संशोधन म्हणजे सातत्याने घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाची प्रक्रियाच आहे. सर्वच निर्णय सुरुवातीला घेता येत नाहीत. पण, योजनेची (संशोधनाची) रूपरेषा आखता येते. रूपरेषा न आखता निर्णय घेतले तर ते चुकीचे ठरतात. कित्येक वेळा अचानक निर्णय बदलण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत संशोधकाला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. यासाठी संशोधन आराखडा हा आपल्या गरजा, आवड व भविष्यातील धोके लक्षात घेऊन तयार करावा लागतो.
संशोधनाच्या उद्दिष्टांनुसार अन्वेषणात्मक / परिचयात्मक, वर्णनात्मक, निदानात्मक आणि प्रयोगात्मक संशोधन आराखडा असे आराखडय़ाचे चार प्रकार आहेत. संशोधन आराखडा तयार करताना संशोधन आराखडा तयार करताना पुढील गोष्टींचा विचार करावा लागतो.
१)   संशोधन का करायचा आहे ? (Why)
२)   संशोधन कोणासाठी करायचे आहे ? (Who)
३)   संशोधन केव्हा करायचे आहे ? (When)
४)   संशोधनात नेमके काय काम करायचे आहे ? (What)
या चार प्रश्नावरून आपल्याला संशोधन समस्या, संशोधनाचा विषय व उदिष्टे मिळण्यास मदत होईल. या चार प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे मिळाल्यावरच पुढील बाबींचा विचार करावा.
१)   संशोधकाची संशोधन विषयातील आवड व हाच विषय का निवडला ?
२)   क्षेत्रीय संशोधनासाठी कोणता भाग निवडायचा?
३)   संशोधनाला एकूण किती वेळ द्यायचा?
वरील तीन प्रश्नावरून संशोधनाची गरज व महत्व आपल्याला लक्ष्यात येईल व स्पष्ट देखील करता येईल.
१)   संशोधनासाठी आवश्यक ती माहिती कुठून व कशी मिळवायची?
२)   संशोधनासाठी त्यातील कोणती माहिती आवश्यक आहे?
३)   नमुना किती मोठा लागेल?
४)   नमुन्याची निवड कोणत्या प्रकाराने करायची?
हे वरील चार प्रश्न आपल्याला संशोधन क्षेत्र, नमुना निवड पद्धत, नमुन्याची व्याप्ती (आकार) हे ठरवणे सोपे जाईल.
१)   तथ्य संकलन कशा प्रकारे करावे ?
२)   संशोधनासाठीची तथ्य कशी मिळवावीत ?
३)   मिळालेल्या तथ्यांचे वर्गीकरण कोणत्या साधनाने करावयाचे?
वरील तीन प्रश्न, तथ्य संकलनाच्या पद्धती, तथ्य विश्लेषणाच्या पद्धती व संख्याशास्रीय तंत्राचा वापर कसा, केव्हा आणि कुठे करायचा. यासाठी महत्वाचे आहे.  

वरील सर्व बाबींचा विचार संशोधनातील (अध्ययनातील) संभाव्य अडचणी दूर करून वेळ, पैसा, श्रम यांची बचत करून संशोधनाची उद्दिष्टय़े साध्य करणे, यासाठी संशोधनाच्या सुरुवातीला संशोधनाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे.



ज्ञानेश दि. महातेकर
पीएच.डी विद्यार्थी
स.म.भा.सं.थोरात महाविद्यालय, संगमनेर
                                                                                                      ९८२२७५१९५५

No comments:

Post a Comment

AI for agriculture: How Indian farmers are harvesting innovation

  Search Impact Industries in Depth AI for agriculture: How Indian farmers are harvesting innovation Published  Jan 11, 2024  · Updated  Apr...