Posts

Showing posts with the label संशोधन आराखडा

संशोधन आराखडा

संशोधन आराखडा संशोधन आराखडा हा संशोधन प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग मानला जातो. आपल्या संशोधनाची रूपरेषा निश्चित करणे म्हणजे संशोधन आराखडा होय. साधी व्याख्या लक्षात घेतली तर ‘‘ संशोधनाचा आराखडा म्हणजे तथ्य जमविणे , त्याचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे यासाठी आखलेली योजना होय. त्यामुळे संशोधनाचा हेतू साध्य होण्यासाठी केलेल्या प्रक्रियेत वेळ , पैसा व श्रमाची बचत होते. ’’ जेव्हा संशोधनाचा विचार संशोधकाच्या डोक्यात असतो. तेव्हाच त्यातून अपेक्षित उत्तर हे तो गृहितकृत्याच्या स्वरुपात मांडतो व त्यानंतर गृहितकृत्याची मांडणी केल्यानंतर संशोधनाचा आराखडा प्रामुख्याने तयार करावा लागतो. आता संशोधन म्हणजे सातत्याने घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाची प्रक्रियाच आहे. सर्वच निर्णय सुरुवातीला घेता येत नाहीत. पण, योजनेची (संशोधनाची) रूपरेषा आखता येते. रूपरेषा न आखता निर्णय घेतले तर ते चुकीचे ठरतात. कित्येक वेळा अचानक निर्णय बदलण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत संशोधकाला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. यासाठी संशोधन आराखडा हा आपल्या गरजा, आवड व भविष्यातील धोके लक्षात घेऊन तयार करावा लागतो. संशोधनाच्या उद्दिष्टांन...